
पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : कळंबोलीत राहणाऱ्या अश्विनी कडव या विवाहितेने पतीच्या बाहेरख्यालीपणाला व दारूच्या व्यसनाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी मृत अश्विनीचा पती नरेंद्र कडव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मृत अश्विनी ही मूळची तळोजा एमआयडीसीतील देवीचा पाडा येथे राहणारी असून २०१६ मध्ये तिचा विवाह कळंबोली गावातील नरेंद्र कडव याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर नरेंद्र कडव याने एकदोन वर्षांत अश्विनीच्या वडिलांनी लग्नात दिलेले सोन्याचे सर्व दागिने विकून मिळालेले पैसे खर्च करून टाकले. याच कालावधीत नरेंद्र कडव याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अश्विनीला मिळाली होती. त्यामुळे अश्विनी व नरेंद्र यांच्यात नेहमी वाद होत होते. तसेच नरेंद्र पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळलेल्या अश्विनीने १२ जून रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील तक्रार मृत अश्विनीच्या वडिलांनी कळंबोली पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी नरेंद्र कडव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85752 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..