निर्देशांक पाव टक्का घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक पाव टक्का घसरले
निर्देशांक पाव टक्का घसरले

निर्देशांक पाव टक्का घसरले

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक पाव टक्का घसरला, उद्याच्या अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. त्यामुळे सेन्सेक्स १५३.१३ अंश; तर निफ्टी ४२.३० अंश घसरला.

अमेरिकी हादऱ्यामुळे जागतिक शेअरबाजार आजही वर-खाली होत असले, तरी कालचा भारतीय चलनवाढीचा तपशील बरा असल्याने आज सेन्सेक्स व निफ्टीमध्ये फारशी पडझड झाली नाही. तरीही आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरले व दिवसअखेरीला सेन्सेक्स ५२,६९३.५७ अंशांवर; तर निफ्टी १५,७३२.१० अंशांवर स्थिरावला.

आज औषधनिर्मिती व आयटी कंपन्या नफ्यात होत्या; तर वाहननिर्मिती व बँका तोट्यात होत्या. इंडसइंड बँक (८३४ रु.), टेक महिंद्र (१,०३०) हे शेअर दोन टक्के; तर एशियन पेंट, मारुती, हिंदुस्थान युनिलीव्हर, एचडीएफसी, रिलायन्स हे शेअर एक टक्का पडले. एअरटेल, एनटीपीसी, महिंद्र आणि महिंद्र, अल्ट्राटेक, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, लार्सन अँड टुब्रो या शेअरचे भाव सुमारे एक टक्का वाढले.

....
आजचे सोनेचांदीचे भाव
सोने- ५१,७१० रु.
चांदी- ५९,८०० रु.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85755 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top