
जुहू चौपाटीवर तीन तरुण बुडाले
मुंबई, ता. १४ ः मुंबईमध्ये १३ ते १८ जून असे सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती आहे. भरतीदरम्यान नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात पोहायला गेलेले तीन युवक आज जुहू चौपाटीवर बुडाले. मुंबई अग्निशमन दल आणि कोस्ट गार्डतर्फे सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.
जुहू चौपाटीवर जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेलजवळील समुद्रात आज संध्याकाळी चारच्या दरम्यान तीन युवक बुडाले. लाईफ गार्ड मनोहर शेट्टी यांच्याकडून माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली. युवकांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या जवानांचीही मदत घेतली जात आहे. अमन सिंग (वय २१), कौस्तुभ गुप्ता (१८) आणि प्रथम गुप्ता (१६) अशी बुडालेल्या युवकांची नावे असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. तिघेही चेंबूर आणि वाशी नाका परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85767 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..