मांडगाव-गाव रस्त्यावरील मोऱ्या नादुरुस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडगाव-गाव रस्त्यावरील मोऱ्या नादुरुस्त
मांडगाव-गाव रस्त्यावरील मोऱ्या नादुरुस्त

मांडगाव-गाव रस्त्यावरील मोऱ्या नादुरुस्त

sakal_logo
By

वाडा, ता. १५ (बातमीदार) ः तालुक्यातील मांडवा- गारगाव व पीक- चिंचपाडा या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावरील अनेक मोऱ्या गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या होत्या. या मोऱ्यांचे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असताना गेल्या वर्षभरात या मोऱ्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. येत्या पावसाळ्यात या नादुरुस्त मोऱ्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे.
वाडा-पीक-चिंचपाडा या प्रमुख जिल्हा मार्गावर मौजे पीक येथे गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने अनेक मोऱ्या वाहून गेल्या आहेत. गेल्या वर्षभरात या ठिकाणी मोठा धोका पत्करून वाहने ये-जा करीत आहेत.या धोकादायक नादुरुस्त मोरीची दुरुस्ती करावी अशी अनेकदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांच्याकडे प्रवासी करत आहेत.
येत्या पावसाळ्यात या ठिकाणाहून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जिल्हा मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, तसेच या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या फेऱ्याही सुरु असतात.
पावासपूर्वी दुरुस्तीची मागणी
मांडवा-गारगांव मार्गावरील अन्य नादुरुस्त मोऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मोऱ्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन या परिसरातील आठ ते दहा गावांतील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85771 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top