राष्ट्रवादीच्या वतीने तीन हजार छत्र्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या वतीने तीन हजार छत्र्यांचे वाटप
राष्ट्रवादीच्या वतीने तीन हजार छत्र्यांचे वाटप

राष्ट्रवादीच्या वतीने तीन हजार छत्र्यांचे वाटप

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे तीन हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्रीवाटप कार्यक्रमास ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस हेमंत वाणी आणि सामाजिक कार्यकर्त्या सीमा वाणी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे तीन हजार नागरिकांना मोफत छत्री देण्यात आली. दरम्यान, देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांना छत्री घ्यावी की पोट भरावे, असा प्रश्न पडला आहे. याच काळात हेमंत वाणी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना मोफत छत्र्या देऊन एक चांगला उपक्रम राबविला आहे, असे मत यावेळी ऋता आव्हाड यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85789 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top