मुलुंडमध्ये एकांकिकांचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये एकांकिकांचे सादरीकरण
मुलुंडमध्ये एकांकिकांचे सादरीकरण

मुलुंडमध्ये एकांकिकांचे सादरीकरण

sakal_logo
By

मुलुंड, ता, १५ (बातमीदार) ः विनय आपटे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक विजेत्या दोन एकांकिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अभिनय निर्मित आणि अभय नवाथे लिखित ‘जीर्णोद्धार’ एकांकिका शिवराम गावडे आणि मनाली राजेश्री सादर करतील; तर जिराफ थिएटर निर्मित आणि राकेश जाधव लिखित-दिग्दर्शित एकांकिका ‘स्टार’चे सादरीकरण अनिल आव्हाड, अक्षता टाले, तुषार ढेपे आणि रोहित वायकर करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता. १७) संध्याकाळी ६.३० वाजता सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी त्यास हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85802 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top