कल्याणमध्ये तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये तरुणीची आत्महत्या
कल्याणमध्ये तरुणीची आत्महत्या

कल्याणमध्ये तरुणीची आत्महत्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका १८ वर्षीय तरुणीने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्व येथे घडली आहे. ही घटना रविवारी (ता.१२) रात्री १० वाजता घडली. पीडितेच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे. पीडितेचा खासगी व्हिडीओ आणि फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन सात जण तिच्यावर गेल्या दीड वर्षांपासून बलात्कार करत होते, असे तिने लिहून ठेवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात आरोपींना पीडितेचा चुलत भाऊ आणि तिची मैत्रीण मदत करत होती. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कल्याण पूर्वेतील साकेत नगर परिसरातील एका इमारतीत ही पीडित तरुणी व आरोपी राहण्यास आहेत. पीडित तरुणीने रविवारी इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मध्यरात्री कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी याची चौकशी केली असता तिच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. या नोटमध्ये मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना लिहून ठेवली होती. त्याआधारे गुन्हा दाखल करीत पोलिसांनी बुधवारी सकाळी ८ जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली. विजय यादव, प्रमेय तिवारी (वय २२), कृष्णा जैयस्वाल (वय १८), सन्नी ऊर्फ निमेश ठाकूर (वय २३), आनंद दुबे (वय २७), शिवम पांडे, निखिल मिश्रा (वय १९) व काजोल जैस्वाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
--------
महिला आयोगाकडून दखल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. याप्रकरणी कडक कारवाई करून कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश चाकणकर यांनी पोलिसांना दिले आहेत. ही माहिती महिला आयोगाच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली.
----------
एका मुलाशी पीडितेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्याने इतर मित्रांना व्हिडीओ व्हायरल करत तिच्यावर अत्याचार करत राहिला. ज्या ज्या व्यक्तीकडे तिने मदतीची याचना केली त्याने तिचे शोषण केले. सातत्याने होणारे अत्याचार सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. सर्व घटनाक्रम तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये कथन केली आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.
- बशीर शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85855 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top