एटीएम केंद्रात वयोवृद्धाची फसवणूक करणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम केंद्रात वयोवृद्धाची फसवणूक करणारा अटकेत
एटीएम केंद्रात वयोवृद्धाची फसवणूक करणारा अटकेत

एटीएम केंद्रात वयोवृद्धाची फसवणूक करणारा अटकेत

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : एटीएम केंद्रात वयोवृद्ध व्यक्तीची हातचलाखीने फसवणूक करून त्या व्यक्तीच्या खात्यातून दोन लाख रुपयांची रक्कम काढून घेतलेल्या सराईत गुन्हेगाराला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. दीपक झा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दीपक झा याच्यावर आणखी दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकांची एकंदर ३७ एटीएम कार्ड मिळाली आहेत.
तक्रारदार वयोवृद्ध व्यक्ती भाईंदर पूर्व येथील बंदरवाडी नाका या ठिकाणी असलेल्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी या व्यक्तीच्या मागे उभ्या असलेल्या इसमाने पैसे काढून देण्यास मदत करतो, असे सांगून वयोवृद्ध व्यक्तीकडे असलेले एटीएम कार्ड शिताफीने स्वत:कडे घेऊन बदल्यात बनावट एटीएम कार्ड त्यांच्या हाती दिले. हे बनावट कार्ड पैसे काढण्यासाठी वापरून आरोपीने तक्रारदाराला पिन क्रमांक विचारला. पिन क्रमांक माहिती झाल्यावर आरोपीने मुद्दाम त्या पिन क्रमांकाद्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्ड बनावट असल्याने पैसे आले नाहीत. पैसे निघत नसल्याचे सांगून आरोपी तक्रारदाराचे एटीएम कार्ड घेऊन निघून गेला. त्यानंतर तक्रारदाराच्या खात्यातून विविध एटीएम केंद्रांतून एकंदर दोन लाख ६ हजार १८५ रुपये काढण्यात आल्याचे व एटीएम कार्डच्या मदतीने वस्तू खरेदी केल्याचे तक्रारदाराला समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वयोवृद्ध व्यक्तीने नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी दीपक झा याला अटक केली. त्याच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, तसेच खरेदी केलेले सामान असा एकंदर १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपीकडे विविध बँकांची ३७ एटीएम कार्ड सापडली. ती जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आरोपीने आणखी अनेक जणांची याच पद्धतीने फसवणूक केली असल्याचा संशय आहे. झा याच्यावर नवघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत.
- शशिकांत शिंदे, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85866 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top