पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचण
पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचण

पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचण

sakal_logo
By

वसई, ता. १५ (बातमीदार) ः वीजपुरवठा खंडित होत असल्याने वसई-विरार शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच पाणीपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकदा पुरवठा खंडित करावा लागतो आहे. मागील पंधरा दिवसांत हे प्रकार तीन वेळा झाल्याने वसई-विरारकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असल्याने तांत्रिक बिघाडावर कायस्वरूपी उपाय शोधावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
वसई-विरार शहराला सूर्या पाणी योजना, उसगाव व पेल्हार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात पाण्याचा साठा उपलब्ध असला तरी अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी वितरित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सूर्या धरणाच्या मासवण, धुकटन येथील फिल्टर प्लांट, पम्पिंग स्टेशनला वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्ण होईपर्यंत शहरात पाणी बंद ठेवण्यात येत आहे. त्यातच सूर्याच्या जुन्या योजनेचे पंप देखील तांत्रिक बिघाडामुळे बंद होत आहेत. त्यातच शहरातील वीजपुरवठाही खंडित होत असल्याने टाकीत पाणी सोडण्यासाठी पंप सुरू होत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना पाणी वेळेवर मिळत नाही.
वास्तविक विजेसंबंधी असणाऱ्या यंत्रणांना पावसाळ्याआधी दुरुस्त व नव्या साहित्याची जोडणी होणे गरजेचे होते. मात्र, पावसाच्या सरी आल्यावर त्वरित वीज गायब होते. त्यातच वसई-विरार महापालिकेने सूर्या धरणाचे असलेल्या पम्पिंग स्टेशनबाबत योग्य ती खबरदारी घेऊन लक्ष दिले नसल्याचे दिसून येते. वारा, पाऊस आला की विजेसोबत पाणीपुरवठा बंद होत असल्याने पावसाळ्यात पाणी सुरळीत मिळेल का, याविषयी वसई-विरारमधील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचण सोडवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

पाणी विकत घेण्याची वेळ
वसई-विरार शहराला पाणीपुरवठा ९, १०, १५ जून बंद ठेवण्यात आला, तसेच पुढचे दिवस अनियमित व कमी दाबाने पाणी वितरित होणार असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे पाण्याची कमतरता गृहसंकुलांसह, सामूहिक नळजोडणी असणाऱ्या वस्तीला भासू लागली आहे. महागड्या बाटल्या किंवा टँकरने पाणी विकत घेत तहान भागवावी लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85867 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top