आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

sakal_logo
By

भांडुप, ता. १६ (बातमीदार) ः शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेस वेळोवेळी मारहाण करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती इमॅन्युएल बारणाबस उलीद्री याला अटक करण्यात आली. याबाबत महिलेच्या वडिलांनी १२ जूनला भांडुप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तिच्या पतीसोबत भांडुप येथे राहत होती. कित्येक दिवस इमॅन्युएल आपल्या पत्नीस मारहाण करून मानसिक त्रास देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याने विवाहितेचे वडिलांनी तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85934 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top