
मतदार याद्यांमध्ये हेराफेरी झाल्यास आंदोलन
वाशी, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात हेराफेरी झाली तर त्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नवी मुंबई भाजपच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी (ता. १४) राज्याचे निवडणूक आयुक्त, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना देण्यात आले.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोग यांनी २ जून रोजी दिले आहेत. त्या अनुषंगाने विधानसभेच्या मतदार याद्यांचे विभाजन करण्याचे काम नवी मुंबई महापालिकेमार्फत सुरू आहे. प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना नियमांप्रमाणे करणे आवश्यक आहे. मतदार यादी बिनचूक करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे; परंतु प्रारूप मतदार याद्या तयार करताना काही बेकायदा प्रकार सुरू असण्याची शक्यता आहे. याआधीही निवडणूक प्रक्रियेमध्ये काही राजकीय पक्षांकडून हस्तक्षेप झालेले आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये नावांची हेराफेरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे यावेळीही कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85936 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..