ठाणे जिल्ह्यावर दरडींचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्ह्यावर दरडींचे सावट
ठाणे जिल्ह्यावर दरडींचे सावट

ठाणे जिल्ह्यावर दरडींचे सावट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे जिल्ह्याला निसर्गाने नटलेला डोंगर रांगांचा परिसर लाभला आहे. मात्र, वाढत्‍या नागरीकरणामुळे डोंगर रांगांवरदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यामुळे डोंगर खिळखिळा व कमकुवत होत असून दरड कोसळून दुर्घटना घडत असतात. जिल्हा प्रशासनाने यंदाच्या मान्सूनच्या काळात होणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेत, ४९ ठिकाणी दरड कोसळणाऱ्या भागांची यादी तयार केली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

डोंगरावरील माती कमकुवत होऊन पावसाळ्याच्या काळात भूस्खलन होन दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यातच ठाणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांवर दरडींची भीती सतत घोंगावत आहे. तसेच यापूर्वीही ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील डोंगरमाथ्यावर पावसाळ्याच्या काळात दरड कोसळून दुर्घटना घडल्या असून, अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सहा महापालिकांसह नगरपालिका आणि ग्रामीण भागातील ४९ ठिकाणी दरड कोसळणाऱ्या भागांची यादी तयार केली असून यामध्ये जवळपास ८७ हजार ९१२ इतके नागरिक बाधित होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये सर्वाधिक १४ ठिकाणे ही ठाणे मनपा क्षेत्रातील आहेत. त्याखालोखाल शहापूर तालुक्यातील १० ठिकाणांची, तर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातही दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

…...............................
चौकट
मनपा क्षेत्र दरड कोसळण्याची ठिकाणांची संख्या बाधित होणारी लोकसंख्या
ठाणे मनपा १४ ६८०००
कल्याण मनपा ०० ००००
नवी मुंबई मनपा ०५ ४३२०
मिरा-भाईंदर मनपा ०१ १६५
भिवंडी मनपा ०८ २०००
उल्हासनगर मनपा ०३ २००
अंबरनाथ नगर परिषद ०० ००००
कुळगाव-बदलापूर न. प. ०० ००००
................................

तहसील क्षेत्र दरड कोसळण्याची ठिकाणांची संख्या बाधित होणारी लोकसंख्या

ठाणे ०१ ५०००

कल्याण ०० ००

भिवंडी ०६ ४२८०

अंबरनाथ ०० ००

उल्हासनगर ०० ००

शहापूर १० ३९४७

मुरबाड ०१ ००

अप्पर तहसील मिरा-भाईंदर ०० ००

......................

कोट :-
दरड कोसळण्याचा परिणाम हा रस्ता वाहतूक आणि रहिवाशांवर होत असतो. त्यामुळे दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार शहरी भागातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व तहसील कार्यालयांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुदाम परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85991 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top