जिल्हा मुद्रांकाचे कामकाज नऊ दिवस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा मुद्रांकाचे कामकाज नऊ दिवस बंद
जिल्हा मुद्रांकाचे कामकाज नऊ दिवस बंद

जिल्हा मुद्रांकाचे कामकाज नऊ दिवस बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : एमआयडीसीतील जागेच्‍या कामासंदर्भातील निर्णया‍साठी ३० हजारांची लाच स्‍वीकारताना रायगडचे सहायक जिल्‍हा निबंधक तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी शैलेंद्र साटम यांना ६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने रंगेहात पकडले. तेव्हापासून शैलेंद्र साटम यांची चौकशी सुरू आहे; मात्र यादरम्यान जिल्हा मुद्रांक आणि सहनिबंधकाचे काम अन्य अधिकाऱ्याकडे न दिल्याने हे कामकाज मागील नऊ दिवस बंद आहे.
काही महिन्यांतच साटम निवृत्त होणार होते. त्याचपूर्वी लाचप्रकरणी त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. न्यायालाने तीन दिवसांची पोलिस कस्टडी दिल्यानंतर साटम बाहेर आले असून त्यांच्याकडे असलेल्या एकूण मालमत्तेची चौकशी सध्या नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे; मात्र शैलेंद्र साटम यांची जबाबदारी कोणत्याही अधिकाऱ्याकडे देण्यात आलेली नाही. त्‍यामुळे जिल्हाभरातून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होत आहे.

जिल्हा नोंदणी कार्यालयातील भ्रष्‍टाचार उघड
साटम यांना रंगेहात पडकताना नवी मुंबईच्या लाचलुचपतच्या पथकाला साटम यांच्‍या टेबलात पाच लाख ६३ हजारांची रोकड सापडली होती. अशाच बेहिशेबी मालमत्तेचा शोध सध्या नवी मुंबई लाचलुचपत विभाग घेत आहे. या कारवाईने जिल्हा नोंदणी कार्यालयातील भ्रष्‍टाचार समोर आला आहे.

जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याचा चार्ज कोणाकडेही दिलेला नसल्याने जिल्हा मुद्रांकाचे काम बंद आहे. कार्यालयातील कर्मचारी त्यांची नियमित, रखडलेली कामे पूर्ण करीत आहेत. निदान प्रभारी चार्ज मिळाल्यानंतर महत्त्‍वाची कामे मार्गी लागू शकतील.
- शिवाजी तेलतुंबडे, सहायक नोंदणी अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86008 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top