
पॉक्सोसंबंधित परिपत्रकावरून वादंग
मुंबई, ता. १७ : पोक्सो किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी काढल्यानंतर विविध स्तरांवरून यावर टीका झाली. या परिपत्रकाविरोधात आता राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा आक्रमक झाल्या असून त्यांनी हे परिपत्रक असंविधानिक असल्याचे सांगितले. तसेच पोलिस प्रशासनाने केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील हे पाहावे, असा सल्लाही पांडे यांना दिला.
राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा व इतर सामाजिक संस्थांनी या परिपत्रकाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. सुशीबेन शहा या वेळी म्हणाल्या की, मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी काढलेले परिपत्रक असंविधानिक असून कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. हे परिपत्रक अतिशय चुकीचे व पोस्को कायद्याच्या मूळ हेतूला तडा देणारे असल्याचा दावा सुशीबेन शहा यांनी केला. हे परिपत्रक तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कायदे बनवणे हे संसदेचे काम आहे, पोलिस प्रशासनाने केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील हे पाहावे, असा सल्लाही सुशीबेन यांनी पोलिस आयुक्तांना दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86064 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..