नुपूर शर्मांना समन्स देण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुपूर शर्मांना समन्स देण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत
नुपूर शर्मांना समन्स देण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत

नुपूर शर्मांना समन्स देण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : पैगंबर मोहंमद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना समन्स देण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीत पोहोचले आहे. नूपुर शर्मा यांचे दिल्लीत वास्तव्य असल्याने त्यांना समन्स देण्यासाठी पायधुनी पोलिस दिल्लीत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा यांना यापूर्वी त्यांच्या ई-मेलवर समन्स पाठवण्यात आले होते. आता प्रत्यक्ष समन्स बजावण्यासाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीत गेले आहे.

पायधुनी पोलिसांनी शर्मा यांना २५ जून रोजी सकाळी ११ वाजता जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पायधुनीपाठोपाठ नूपुर शर्मांना मुंब्रा पोलिसांनी चौकशीसाठी २२ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मुंब्रा येथील मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. शर्मा यांच्या विरोधात अनेक राज्यांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86071 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top