राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चैत्रालीला रजत पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चैत्रालीला रजत पदक
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चैत्रालीला रजत पदक

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चैत्रालीला रजत पदक

sakal_logo
By

ठाणे, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्यातील चैत्राली शिरसाठ हिने रजत पदकाची कमाई केली आहे. कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने १० ते १२ जून या कालावधीत बालेवाडी, पुणे येथील श्री शिव छत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चैत्राली ही ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहे. चैत्राली पाचवी इयत्तेपासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. तिने आतापर्यंत राष्ट्रीय कराटे स्पर्धेत २ रजत पदक, १ कांस्य पदक, तर जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तिने अनेक पदक पटकावली आहेत. चैत्राली ही काटा आणि कुमिटे या प्रकारामध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून, स्व-संरक्षण, लक्ष केंद्रीकरण यामध्ये तिने प्रावीण्य मिळविले आहे. चैत्राली ही मागील चार वर्षांपासून चैतन्य काळे यांच्या कराटे अकादमीमध्‍ये प्रशिक्षण घेत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86085 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top