
विक्रमगड तालुक्याचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल 95.54 टक्के
विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये विक्रमगड तालुक्यातून एकूण २२६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २१६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तालुक्यातील दहावीचा निकाल ९५.५४ टक्के लागला असून भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम, विक्रमगड या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून या शाळेचा सलग शंभर टक्के निकाल लागला आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळेचा ही १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यादान विद्यामंदिर सावरखिड आंबेघर या शाळेचा निकाल १०० टक्के, विक्रमगड हायस्कूल विक्रमगडचा निकाल ८७.४० टक्के लागला आहे. अरविंदा स्मृती आश्रमशाळा ९३.७५ टक्के, आदर्श विद्यालय उटावली १०० टक्के, केव् स्कूल ९८.४३ टक्के, साखरे हायस्कूल ९८.२६ टक्के, साखर आश्रमशाळा १०० टक्के, भडांगे हायस्कूल वाकी १०० टक्के, माध्यमिक आश्रमशाळा माणचा निकाल ९८.६३ टक्के लागला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86093 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..