कासा वनरक्षक अखेर एसीबीच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा वनरक्षक अखेर एसीबीच्या जाळ्यात
कासा वनरक्षक अखेर एसीबीच्या जाळ्यात

कासा वनरक्षक अखेर एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By

कासा, ता. १८ (बातमीदार ) : शिवदास सोनवणे या वनरक्षकाला अखेर पालघर एसीबीने लाच घेताना अटक केली आहे. पिंपळशेत कार्यक्षेत्रातील एका गावातील ग्रामस्थाला वन पट्ट्याखाली वाटप केलेल्या जागेत बांधबंदिस्ती करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून वनरक्षक शिवदास सोनवणे यांची भेट घेतली. त्यानंतर सदर वन पट्ट्याच्‍या जागेवर बांधबंदिस्तीसाठी कुठलीही परवानगी देणार नाही, असे त्यांनी सदर ग्रामस्थाला सांगितले.
त्यानंतर पुन्हा भेट घेऊन यातून मार्ग काढत शिवदास याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली; परंतु तक्रारदाराने सरळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पडताळणी केली असता वनपट्ट्यावरील बांधबंदिस्तीसाठी शिवदास सोनवणे यांनी दहा हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यात आरोपीने स्वत: पैसे न घेता एका खासगी व्‍यक्‍तीस पैसे घेण्यास सांगितले व काही तासांतच हा सापळा यशस्वी ठरला. खासगी व्‍यक्‍तीला पंचांसमक्ष दहा हजार रुपये घेताना कासा पोलिस ठाण्यासमोरील भाजी दुकानात रंगेहाथ पकडले. यात त्‍या व्‍यक्‍तीलासुद्धा शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86099 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top