पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे २१ जूनला विरारमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे २१ जूनला विरारमध्ये
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे २१ जूनला विरारमध्ये

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे २१ जूनला विरारमध्ये

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे मंगळवारी (२१ जून) सायंकाळी ४ वाजता विरार-मरंबळपाडा येथे येणार आहेत. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत मरंबळपाडा येथे उभारण्यात आलेल्या माहिती केंद्राचे उद्‌घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित असतील.
कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानअंतर्गत कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून विरार पश्चिम येथील मरंबळपाडा येथे कांदळवन आणि जैवविविधता माहिती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. ज्यात कांदळवन जैवविविधता, तिथे सुरू असलेल्या शाश्वत कांदळवन संवर्धनाची कामे इत्यादी दर्शवण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धनात कांदळवनांचे महत्त्व खूप मोठे आहे. विविधदृष्ट्या ती मानवाला उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देतात. तसेच नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण करतात.
अशा या समृद्ध जागेची क्षमता ओळखून, कांदळवन व सागरी जैवविविधतेचे महत्त्व अधिक चांगल्या व बोलक्या स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठानमार्फत कांदळवन व सागरी जैवविविधता माहिती केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86101 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top