
घरकाम करणारी महिला दहावी उत्तीर्ण!
जीवन तांबे
चेंबूर, ता. १९ ः घरगुती अडचणी आणि आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक महिलांना दुसऱ्याकडे घरकाम करावे लागते. अशीच आरे कॉलनी परिसरात घरकाम करणारी महिला केवळ जिद्दीच्या जोरावर दहावी परीक्षेत साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिचा मुलगाही यंदा दहावी परीक्षेत एकूण ६८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे.
मुंबई परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात आहे. घरकाम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवताना पाहायला मिळते. लग्नापूर्वी अर्धवट शिक्षण राहिलेल्या महिलांची संख्या मोठी आहे. केवळ शिक्षणाची जिद्द व मासूम संस्थने शिक्षणाकरिता केलेले मार्गदर्शन या जोरावर आरे कॉलनी परिसरात घरकाम करणाऱ्या शिल्पा गंगावणे यांनी जोगेश्वरी येथील रात्रशाळेत दहावीला प्रवेश घेतला. काम, कुटुंब व अभ्यास सांभाळून दहावीच्या परीक्षेत यंदा एकूण ६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या मुलाने यंदा दहावी परीक्षेत एकूण ६८ टक्के गुण मिळविले. त्याला आई उत्तीर्ण झाल्याचा आनंद अधिक आहे. अनेकांनी या घरकाम करणाऱ्या महिलेचा आदर्श ठेवण्याची गरज ठरणार आहे. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक मुलाने शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहता येईल,’ अशी प्रतिक्रिया शिल्पा यांनी दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86112 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..