जुईनगरमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगरमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी
जुईनगरमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी

जुईनगरमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी

sakal_logo
By

नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : जुईनगर सेक्टर २४ मधील चिंचोली तलावालगत महापालिकेचे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक केंद्रात चोरी झाल्याची घटना घडली. यापूर्वीही या केंद्राच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची आणि महापालिका प्रशासनाने सीसी टीव्ही लावण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

जुईनगरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या केंद्रालगत असलेल्या उद्यानामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत स्थानिक रहिवाशांचा वावर आहे. चोरीच्या घटनेनंतर रात्रीच्या अंधारात ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या अथवा घातपात करण्याच्या घटना घडण्याची स्थानिकांमध्ये भीती आहे. उद्यान व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रापासून हाकेच्या अंतरावर पोलिस बीट चौकी आहे. ही चौकी नेहमीच बंद असते. या उद्यानामध्ये व सभोवतालच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे आणि सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यासाठी नेरूळ तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86116 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top