
घणसोली,आळंदी-पंढरपूर पायी दिंडी वारी
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) ः खारी कळवा-बेलापूर पट्टीतील वारकर्यांनी गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त घणसोली ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी वारीला प्रारंभ केला. श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीने वीणा पूजन करण्यात आले.
या वेळी दिंडीचे विणेकरी ह.भ.प मोरेश्वर महाराज म्हात्रे, ह.भ.प प्रवीण वैती व ह.भ.प भगत महाराज यांचे पूजन हभप हरिश्चंदबुवा पाटील आणि त्यांच्या पत्नी ह.भ.प. विश्रांती पाटील यांनी केले. दिंडी चालक तथा वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुनील महाराज रानकर, महिला कीर्तनकार ह.भ.प. धनश्री रानकर, ह.भ.प. शंकर म्हात्रे, ह.भ.प. पांडुरंग म्हात्रे,ह.भ.प. बाबुरावबुवा पाटील,ह.भ.प. बाळूबुवा केवळे यांच्यासह घणसोलीतील श्रीराम मंदीराला टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाच्या तालावर वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रदक्षिणा घालून माऊलीचा जयघोष करीत पायी दिंडी निघाली.
घणसोलीतून निघालेली पायी दिंडी वीणा घेऊन रविवारी देवाची आळंदी येथे पोचणार आहे. त्यानंतर आळंदीवरून मंगळवारी (ता. २१) माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. ९ जुलै रोजी पंढरपूर येथे विठू माऊलीच्या नगरीत दाखल होतील, अशी माहिती ज्येष्ठ कीर्तनकार सुनील महाराज रानकर यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86143 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..