
प्रवीण दरेकर गिरीश महाजनांसह हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला
विरार, ता. १८ (बातमीदार) ः विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघा एक दिवस राहिला असल्याने शनिवारी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी विरार येथे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी वेळ वाचविण्यासाठी रेल्वेने चर्चगेट ते विरार प्रवास केला.
राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन गेले होते. त्यानंतर भाजपचा उमेदवार निवडून आल्याचे बोलले जात असतानाच परत एकदा ते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी आल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. जवळपास दोन तास बंद दाराआड भाजपचे दोन नेते आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात चर्चा सुरू होती.
हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच आम्हाला मदत केली आहे. यावेळीही ते मदत करतील. राज्यसभेच्या वेळीही त्यांनी सांगितले होते की, जिथे विजय तिथे आम्ही. यावेळीही विजय हा भाजपचा असल्याने आप्पांच्या बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आम्हालाच मिळेल.
- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86154 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..