
लोढा पलावा येथे ऑफलाईन पध्दतीने घरगुती गॅस पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : लोढा पलावा व आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ते चार कि.मी. गॅसची स्टील लाईन टाकणे जरुरीचे असून, ती दिवा-पनवेल रेल्वेलाईनच्या रुळांखालून टाकावी लागणार आहे. या कामासाठी किमान दोन ते तीन वर्षे कालावधी लागणार आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता या भागात तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाईन पद्धतीने गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. खोणी येथे प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू करण्यात आले असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हे काम लवकर मार्गी लागले आहे.
महानगर गॅस कंपनीने सर्व तांत्रिक बाजू तपासण्याची प्रक्रिया चालू केली असता यात जागा शोधणे, त्यासाठीच्या परवानग्या मिळवणे, त्यातील अडथळे अशा अनेक अडचणी समोर आल्या; मात्र त्या सर्व अडचणींवर मात करण्यात यश आले आहे. खासदारांनी केलेल्या मदतीबद्दल महानगर गॅस कंपनीने पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले असल्याचे प्रफुल्ल देशमुख यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर खोणी येथे लोकशेअर ग्रीन परिसरातील रस्त्यावर ५० मीटर पट्ट्यात स्टील लाईन टाकण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. यामुळे आता लोढा पलावा शहर, कासा बेला, कासा रिओ इत्यादी परिसरातील स्टील लाईन टाकण्याचे काम करणे आता सुकर झाले आहे.
पलावा शहर येथील लेकशोअर, कासाबेला, कासा रिओ या तीन ठिकाणी गॅस सिलिंडर्सची साठवणूक विशिष्ट ठिकाणी व आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींची काळजी घेऊन योग्य पद्धतीने करण्यात येईल. प्रत्येकाच्या घरात गॅसपुरवठा देण्यात येणार आहे. सदर कामाबरोबरच प्रत्येक इमारतीत व प्रत्येक ब्लॉकमधील फिटिंग्जचे कामही पूर्ण करण्यात येईल व टप्प्याटप्प्याने नागरिकांना घरगुती गॅसपुरवठा चालू होईल.
डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86157 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..