माजी खजिनदार आप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी खजिनदार आप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक
माजी खजिनदार आप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

माजी खजिनदार आप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेच्या माजी खजिनदाराला मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक केली आहे. कोल्हापुरातील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना शुक्रवारी (ता. १७) ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. विशेष न्यायालयाने २४ जूनपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. आप्पासाहेब देशमुख यांचे भाऊ आणि धर्मादाय शैक्षणिक संस्थेचे माजी प्रमुख महादेव रामचंद्र देशमुख यांना या प्रकरणात मे महिन्यात ईडीने अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार आप्पासाहेब रामचंद्र देशमुख हे २०११ ते २०१६ या काळात शैक्षणिक संस्थेचे कोषाध्यक्ष होते. त्यांचा भाऊ आणि इतरांच्या संगनमताने एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांकडून सुमारे २९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र नव्हते, अशा विद्यार्थ्यांकडून एमबीबीएसला प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांना फसवल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. तपासादरम्यान असे आढळून आले, की पैशांचा स्रोत लपवण्यासाठी ते आप्पासाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले गेले. याप्रकरणी महादेव, आप्पासाहेब देशमुख आदींविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86162 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top