सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योग दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योग दिन
सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योग दिन

सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योग दिन

sakal_logo
By

नेरूळ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता. २१) सकाळी ६ वाजता वाशी सेक्टर ३० ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविषयक विशेष उपक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. आरोग्यासह व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या योगाचे महत्त्व जनमानसात प्रसारित व्हावे, यादृष्टीने महापालिकेच्या वतीने सिडको महामंडळ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच आबालवृद्ध नागरिक, महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86188 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top