
अदाणी इलेक्ट्रीसिटीचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष
मुंबई, ता. १९ : या पावसाळ्यात खबरदारी म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) ने मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. येथे ग्राहक विविध मार्गांनी चोवीस तासांत केव्हाही संपर्क करू शकतील.
एखाद्या दुर्घटनेबाबत तत्काळ कृती करण्यासाठी, तसेच वीजपुरवठा सुरू राहावा यासाठी या कक्षामार्फत समन्वय साधला जाईल. मुंबईत पाणी साचणाऱ्या सखल भागांमध्ये विजेच्या उपकरणांची उंची वाढवण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. तसेच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी शीघ्र कृती दलाची नेमणूक करण्यात आली आहे. आपत्कालीन प्रतिसादासाठी बोटी आणि गाड्या तसेच आपत्कालीन वापरासाठी डिझेल जनरेटर सेट्स आणि पाण्याचा उपसा करणारे पंपदेखील कंपनीकडून महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याबाबत किमान तक्रारी येतील, असे अदाणीच्या प्रवक्त्याने सांगितले.
...
हेल्पलाईन क्रमांक
- टोल फ्री हेल्पलाईन १९१२२.
-आग, शॉक लागणे या घटनांसाठी संपर्क सेंट्रल डिझास्टर कंट्रोल सेंटर, दूरध्वनी - ०२२- ५०५४९१११ / ०२२ – ५०५४७२२५. (जून २०२२ ते सप्टेंबर २०२२) ग्राहकांच्या तक्रारींसाठी व्हॉट्सअप क्रमांक ९५९४५१९१२२.
- अदाणी इलेक्ट्रिसिटीची वेबसाईट www.adanielectricity.com
- फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर साठी @Adani_Elec_Mum
- अदाणी इलेक्ट्रिसिटीचे मोबाईल अॅप https://bit.ly/३५DlpYd
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86194 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..