अनधिकृत रिक्षास्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत रिक्षास्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी
अनधिकृत रिक्षास्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी

अनधिकृत रिक्षास्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी

sakal_logo
By

घणसोली, ता. २ १ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात वाढत्या रिक्षांच्या तुलनेत अनधिकृत रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढत चालली आहे. घणसोली रेल्वे स्थानकासमोरील चौकात दोन रिक्षा स्टॅंड असून ते १५ मीटरच्या अंतरावर आहेत. या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अधिकृत फलक नसल्याने हे रिक्षा स्टँड अधिकृत की अनधिकृत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एके काळी शांत असलेल्या घणसोली परिसरात आता वाहतुकीची कोंडी नित्याची होऊ लागली आहे. काही ठिकाणी सार्वजनिक प्रवासी वाहनांची सुविधा नसल्याने सहा आसनी रिक्षा आणि शेअर रिक्षांची संख्या वाढली आहे. या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असून, घणसोली परिसरात बेशिस्त रिक्षाचालक वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. घणसोली रेल्वे स्थानकासमोर अधिकृत रिक्षा स्टॅण्ड असूनही अगदी १५ मीटरच्या अंतरावर काही रिक्षाचालकांनी आपला नवीन रिक्षा स्टॅण्ड थाटला आहे. रेल्वे स्थानक गर्दीचा भाग असल्याने हा रिक्षा स्टॅण्ड वाहने आणि पादचाऱ्यांसाठी अडथळा होत आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांकडून नवी मुंबई वाहतूक पोलिस हजारोंचा दंड वसूल करतात. गणवेश परिधान न करणाऱ्या, भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते; परंतु चौकात अनधिकृतपणे रिक्षा थांबवून वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा करणाऱ्या रिक्षांचा बंदोबस्त का केला जात नाही, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मद्यपी रिक्षाचालक
या रिक्षा स्टॅण्डवर काही रिक्षाचालक हे रात्रीच्या वेळी मद्यपान करून प्रवासी भाडे भरत आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे.

घणसोली रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षांमुळे नागरिकांना चालायला जागा उरत नाही. वाहतूक विभाग या वाहतूक कोंडीवर मार्ग कधी काढणार आहे?
- अक्षय करंडे, नागरिक

स्थानकासमोर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांवर अनेकदा कारवाई केली आहे. कारवाईनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. अनधिकृत स्टॅण्डवर, बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचे सत्र वाहतूक विभागाकडून सुरू आहे.
- उमेश मुंडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86195 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top