राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रुती कुलकर्णी पारितोषिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रुती कुलकर्णी पारितोषिक
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रुती कुलकर्णी पारितोषिक

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रुती कुलकर्णी पारितोषिक

sakal_logo
By

नेरूळ (बातमीदार) : पुणे विद्यार्थीगृहाच्या नेरूळ येथील शिक्षण संकुलाच्या श्रुती कुलकर्णी या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सायन्स ॲण्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर आयोजित कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे १५ ते १७ जूनदरम्यान राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. राज्य किंवा केंद्र पातळीवर निवडले गेलेले प्रकल्प आणि गेल्या तीन वर्षांत इन्स्पायर अवॉर्ड मिळालेल्या विज्ञान प्रकल्पांना महाराष्ट्र राज्यातून येथे आमंत्रित करण्यात आले. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या श्रुती अविनाश कुलकर्णी या विद्यार्थिनीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत राष्ट्रीय स्तरावर सादर केलेला प्रकल्प या प्रदर्शनात मोठ्या गटात सादर केला. या प्रकल्पाची निवड उत्तेजनार्थ प्रकल्प म्हणून करण्यात आली. पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, प्रा. कृ. ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, दिनेश मिसाळ, मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर यांनी तिचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86202 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top