
अग्निपथ विरोधात मीरा भाईंदर युवक कॉंग्रेसचा मशाल मोर्चा
भाईंदर, ता. १९ (बातमीदार): केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेचा मिरा भाईंदर, ओवळा माजिवडा विधानसभा युवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. अग्निपथच्या नावाखाली तरुणांची थट्टा चालविली आहे. देशसेवेसाठी चार वर्षे दिल्यानंतर नोकरी सोडावी लागणार असल्याने तरुणांचे उर्वरित आयुष्य अंधकारमय होणार असल्याचा आरोप ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष कुणाल काटकर यांनी केला. देशाच्या संरक्षण यंत्रणेत ठेकेदार पद्धतीने चार वर्षांसाठी जवान तयार करणे ही तरुणांची थट्टा असून या योजनेचा पुनर्विचार करण्याची मागणी मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी केली. बी. पी. रोड ते नवघर नाक्यापर्यंत निघालेल्या मशाल मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, प्रवक्ते प्रकाश नागणे, राकेश राजपुरोहित, उमेश यादव, जितेश व्होरा यांच्यासह युवक काँग्रेसचे दीप काकडे, अन्वर खान, समीरा अन्सारी, प्राची तावडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86213 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..