माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १९ (बातमीदार) : नगरपालिका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
अंबरनाथमधील विविध ठिकाणच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या द युवा युनिटी फौंडेशन आणि जायन्ट्स ग्रुप ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक १६ मधील ८० मुलींना पाटी, वही, पेन्सिल, चित्रकला वही आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांबाबत वेगळा आदर असल्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष योगेश चलवादी यांनी सांगितले. शाळेच्या शिक्षिका महामुनी, रोहिणी बुधवंत, सुरेख पाटील, हिरवे तसेच फौंडेशनतर्फे अमन विश्वकर्मा, प्रवीण गुप्ता आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86245 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top