शिवसेनेने केले ठाकूरांकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेने केले ठाकूरांकडे दुर्लक्ष
शिवसेनेने केले ठाकूरांकडे दुर्लक्ष

शिवसेनेने केले ठाकूरांकडे दुर्लक्ष

sakal_logo
By

विरार, ता. १९ ः राज्यसभा निवडणुकीच्या वेळी दोन वेळा शिवसेनेचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या तीन मतांचा जोगवा मागण्यासाठी आले होते; परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने ठाकूर यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे वसई-विरारमध्‍ये शिवसेना आणि बविआ एकमेकांसमोर पुन्हा एकदा उभे ठाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना आणि बविआ यांच्यातून वसई-विरारमध्ये विस्तवही जात नाही. असे असतानाही शिवसेनेचे नेते राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे मताचा जोगवा मागण्यांसाठी दोन वेळा आले होते. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. सेनेच्या उमेदवाराच्या पराभवानंतर सेनेचे खासदार संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीची तीन मते आणि इतर अपक्षांची मते मिळाली नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष सेनेवर नाराज झाले होते; तर दुसऱ्या बाजूला राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीला शिवसेनेने अधिकचा उमेदवार दिला नसून त्यांनी आपल्याकडे असलेल्या मतांच्या कोट्याप्रमाणे दोनच उमेदवार उभे केल्याने सेनेला यावेळी मतांसाठी जोगवा मागण्याची गरज नसल्याचे दिसून येत आहे. त्‍यामुळेच त्यांनी बविआकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86248 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top