डोंबिवलीत स्कायवॉकवर पादचाऱ्याला मारहाण करत लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivli pedestrian was beaten and robbed on skywalk
स्कायवॉकवर पादचाऱ्याला लुटले

डोंबिवलीत स्कायवॉकवर पादचाऱ्याला मारहाण करत लुटले

डोंबिवली : डोंबिवली स्टेशनबाहेरील स्कायवॉकवर पादचाऱ्याला मारहाण करून लुटण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी जयेश मालिया आणि पुरुषोत्तम मालिया यांना रामनगर पोलिसांनी अटक केली. अनिलकुमार खाडे हे शुक्रवारी रात्री घरी जात असताना स्कायवॉकवर बसलेल्या ब्रेड विक्रेत्याला हा कसला शिळा ब्रेड विकत आहे, असे बोलले. याचा राग विक्रेत्याच्या शेजारी बसलेल्या जयेश मालिया आणि पुरुषोत्तम मालिया यांना आल्याने त्यांनी खाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या खिशातील २ हजार रुपये काढून घेतले.

याप्रकरणी अनिलकुमार यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, प्रशांत सरनाईक यांच्या पथकाने सापळा रचत आरोपींना कल्याण जोशीबाग येथून ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून २ हजार रुपये देखील हस्तगत केले आहेत. यातील आरोपी जयेश मालिया याच्यावर या अगोदरही गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86269 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top