फसवणुकीप्रकरणी पाच बांधकाम व्यवसायिकांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणुकीप्रकरणी पाच बांधकाम व्यवसायिकांना अटक
फसवणुकीप्रकरणी पाच बांधकाम व्यवसायिकांना अटक

फसवणुकीप्रकरणी पाच बांधकाम व्यवसायिकांना अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मुंबईतील पाच बांधकाम व्यावसायिकांना शनिवारी (ता. १९) रात्री उशिरा अटक केली आहे. तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत ही अटकेची कारवाई करण्यात आली. ग्राहकांकडून पैसे घेऊनदेखील घर उपलब्ध करून न देता फसवणूक केल्याचा आरोप या बांधकाम व्यावसायिकांवर आहे. मंगेश सावंत, जयेश रामी, जयेश शाह, आश्‍विनी मिस्त्री, राजेश सावला यांचा यात समावेश आहे.

पहिल्या प्रकरणातील जयेश शाहविरुद्ध मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. पैसे घेऊनही जवळपास १०० लोकांना घरे न दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शाह विरुद्ध फसवणुकीचे १० गुन्हे दाखल केले आहेत. दुसऱ्या प्रकरणातील आरोपी राजेश सावला, अश्विन मिस्त्री, जयेश रामी या तिघांविरुद्ध २३ एप्रिल २०२२ ला गुन्हा दाखल केला गेला. यांनी अनिल हळदणकर नावाच्या व्यक्तीला एक फ्लॅट ७६ लाखांना विकला होता; मात्र हाच फ्लॅट आधीच कुणाला तरी विकला असल्याचे हळदणकर यांच्या लक्षात आले. या तिघांविरोधात अशा प्रकारे फसवणुकीचे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिसऱ्या प्रकरणातील आरोपी मंगेश सावंतविरोधात २३ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला गेला आहे. सावंतने रमाकांत जाधव या व्यक्तीकडून एका कामात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली १५ कोटी रुपये घेतले आणि काम पूर्ण केले नाही. अशा प्रकारे एकाच वेळी पाच बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई झाल्याने बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86270 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top