तीन अपघातांमुळे वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन अपघातांमुळे वाहतूककोंडी
तीन अपघातांमुळे वाहतूककोंडी

तीन अपघातांमुळे वाहतूककोंडी

sakal_logo
By

पनवेल ः सायन-पनवेल मार्गावर कामोठे येथील उड्डाणपुलावर सकाळी आठ वाजता अपघाताची घटना घडल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावरील खारघर उड्डाणपुलावर तीन वाहने एकमेकांवर धडकून अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर बेलापूर खिंडीमध्येही दोन वाहनांमध्ये किरकोळ अपघात झाला. अपघातात देखील कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या तीन अपघातांमुळे रविवारी दिवसभर सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडीसदृश्य परिस्थिती होती. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा फटका बसला. वाहतूक पोलिसांचीदेखील चांगलीच तारांबळ उडाली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86275 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top