माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचे सुयश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचे सुयश
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचे सुयश

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचे सुयश

sakal_logo
By

मातोश्री, द्वारका विद्यामंदिरचा १०० टक्के निकाल
कल्याण, ता. २० : मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय व द्वारका विद्यामंदिर माध्यमिक नांदिवली, कल्याण पूर्व या दोन्ही शाळांनी शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या दोन्ही शाळांमधील सर्वच्या सर्व ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मातोश्री शाळेची प्रिया वाबळे ९६.८० टक्के मिळवून प्रथम, पल्लवी मुरटे ९६.४० टक्के द्वितीय, सर्वेश झनके ९५ टक्के गुण मिळवून तृतीय आला. द्वारका विद्यालयाची तनुजा रायकर ९३.२० टक्के प्रथम, शीतल गळवे ९०.८० द्वितीय, रितेश राठोडने ९०.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोन्ही विद्यालयांच्या १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. संस्थाचालक दत्तात्रेय दळवी व संचालिका मिरा दळवी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86316 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top