पदपथावरील गटार उघडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावरील गटार उघडे
पदपथावरील गटार उघडे

पदपथावरील गटार उघडे

sakal_logo
By

वडाळा, ता. २१ (बातमीदार) ः रफी अहमद किडवाई मार्ग येथील एसआयडब्लूएस शाळेच्या पदपथाच्या रस्त्यालगत असलेल्या मुख्य गटार लाईनवरील गटार चार फूट खोल असून गेल्या एक महिन्यापासून झाकण नसल्याने या उघड्या गटारात पडून एखाद्यास इजा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी पावसाच्या पाण्यात या गटाराचा अंदाज न आल्याने एखादा पादचारी अथवा शाळकरी विद्यार्थी गटारात पडून मृत्युमुखी पडण्याची भीती पदाचाऱ्यांमधून व्यक्त होत असून या गटारावर झाकण लावण्यात यावे, अशी मागणी पदाचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या समस्येबाबत महापालिकेच्या फ उत्तर विभागात लेखी पत्राद्वारे तक्रार देण्यात आली असल्याचे समाजसेवक भगवान कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86318 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top