पावसाळ्यात साथीचे आजार, कोरोनाचीही दक्षता घ्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात साथीचे आजार, कोरोनाचीही दक्षता घ्‍या
पावसाळ्यात साथीचे आजार, कोरोनाचीही दक्षता घ्‍या

पावसाळ्यात साथीचे आजार, कोरोनाचीही दक्षता घ्‍या

sakal_logo
By

कल्याण, ता. २० ( बातमीदार ) : कल्याणसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना पावसाळ्यात सर्दी, ताप आणि डोकेदुखी अंगावर न काढण्याचे आवाहन पालिकेसह शहरातील डॉक्टर वर्गाकडून करण्यात आले आहे.
कल्याणसह राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू आणि व्हायरल फिव्हरसारखे आजारही या काळात डोके वर काढतात. या दिवसांमध्ये लोकांची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत कोविड-१९ चा संसर्गही सुरू आहे. या कारणास्तव कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे लहान मुले, वयोवृद्ध आणि तरुणांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन पालिका आणि खासगी डॉक्टर वर्गाकडून करण्यात आले आहे.


कोट
कोविड-१९ मध्ये तापासोबत घसा खवखवणे हे एक मोठे लक्षण आहे. तापात आराम नसेल तर ताबडतोब कोरोनाची तपासणी करणे आवश्‍‍यक आहे.
- डॉ. अभय गायकवाड, संचालक, सिद्धिविनायक मल्टीस्पेशॅलिटी हॉस्‍पिटल ॲण्ड कार्डीयाक केअर सेंटर, कल्‍याण


काय खबरदारी घ्याल?
पाणी गाळून आणि उकळून प्या.
आपल्या घराची आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता राखा.
रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू सॅनिटाईझ करा.
हातांची स्वच्छता राखा, जेवणाआधी आणि शौचालयाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवा.
शिंकताना तसेच खोकताना तोंडासमोर रुमाल धरा.
पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा.
शाळा, हॉस्पिटल, रेल्वे, कार्यालयात शक्यतो मास्कचा वापर करा.

-------------------------------------------------------------------
१९ जून रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची रुग्ण संख्या
मागील २४ तासांत ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत; तर ४५ रुग्णांनी डिस्चार्ज घेतला असून आजपर्यंत १,६३,९३० बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

कल्याण पश्चिमेला सर्वात जास्त रुग्ण
मागील २४ तासांत ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, कल्याण पूर्व ८, कल्याण पश्चिम ३८, डोंबिवली पूर्व २८, डोंबिवली पश्चिम १०, मांडा टिटवाळा ३ आदींचा समावेश आहे.

साथीच्या आजराची आकडेवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार

एप्रिल २०२२ मे २०२२ जून २०२२ एकूण

गेस्ट्रो २० १२ १४ ४६

डायरिया ३ ८ १८ २९

डिसेंट्री ३३ २१ ७ ६१

कावीळ २ ५ ५ १२

टायफाईड १४ ८ १७ ३९

मलेरिया ४ २ १ ५

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86330 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top