तीन तोतया एनसीबी अधिकारी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Mumbai Police arrest three puppet officers posing as Narcotics Control Bureau officials mumbai
तीन तोतया एनसीबी अधिकारी गजाआड

तीन तोतया एनसीबी अधिकारी गजाआड

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी अशी ओळख सांगणाऱ्या तीन तोतया अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बॉलीवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवल्याबद्दल अटक करण्याची धमकी देऊन आरोपींनी सहायक चित्रपट दिग्दर्शकाला दोन लाख रुपयांना लुबाडल्याचा आरोप आहे. दीपक जाधव, पंकजकुमार पाल आणि सचिन सिंग अशी या तिघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सापळा रचून या तोतयांना जोगेश्‍वरी पश्‍चिम द्रुतगती मार्गावरून मुद्देमालासह अटक केली.

गेल्या बुधवारी सहायक चित्रपट दिग्दर्शक अंधेरीतील एका रेस्टॉरंटमधून घरी निघाला असताना ही घटना घडली. दिग्दर्शक घरी निघाला असताना रिक्षातून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून एनसीबीचे अधिकारी असल्याची बतावणी करत रिक्षात बसवले. तसेच तुम्ही बॉलीवूड पार्ट्यांमध्ये एमडी पुरवत असल्याचे सांगून दोन लाख रुपये न दिल्यास अटक करू अशी धमकी दिली. तसेच आपले नाव पाटील असल्याचे सांगत त्यातील एकाने दिग्दर्शकाच्या वडिलांना फोन करून दोन लाख रोख घेऊन अंधेरी-जुहू पुलावर येण्यास सांगितले. तसेच त्यांनी आर्यन खानला अटक केलेल्या पथकाचा भाग असल्याचाही दावा केला.

यानंतर दिग्दर्शकाच्या वडिलांनी घटनास्थळी पोहोचून तोतयांना एक लाख रुपये दिले; मात्र आरोपींनी ही रक्कम घेऊन उर्वरित रक्कम दोन तासांत न दिल्यास मुलाविरोधात अटक वॉरंट जारी करू अशी धमकी दिली. यानंतर दिग्दर्शकाच्या वडिलांना एनसीबी मुंबईमध्ये पाटील नावाच्या व्यक्तीबाबत चौकशी केली असता येथे असा अधिकारी नसल्याचे समोर आले. त्यानंतर दिग्दर्शक आणि त्याच्या वडिलांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार नोंदवली. यानंतर आरोपींना उर्वरित पैसे देण्याच्या बाहण्याने बोलावून घेत पोलिसांनी सापळा रचून तीन तोतयांना अटक केली. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86333 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top