झोपडपट्टीमुक्त पनवेलचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडपट्टीमुक्त पनवेलचा मार्ग मोकळा
झोपडपट्टीमुक्त पनवेलचा मार्ग मोकळा

झोपडपट्टीमुक्त पनवेलचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

पनवेल, ता. २० (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने झोपडपट्टी मुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय शहरात रोजबाजार उपलब्ध होणार आहे. याशिवाय सायन-पनवेल महामार्गावरील एलईडी दिवे बसविण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.
शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली महासभा संपन्न झाली. यावेळी उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व सदस्य उपस्थित होते. महासभेत सिडको वसाहतीतील नगरसेवकांनी पाणी समस्‍येवर आवाज उठवला.
पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचा कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीचे प्रयत्‍न सुरू आहेत. महापालिका क्षेत्रातील २००० पूर्वीच्या १,००५ झोपड्या व नंतरच्या ३,५८६ झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आठ झोपडपट्ट्यातील २,०६२ रहिवाशांच्या पुनर्वसन प्रस्तावित आहे.
पहिल्या टप्प्याचे काम महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे काम हस्तांतर केलेल्या भूखंडावर आहे . आता तिसऱ्या टप्प्याचे काम इंदिरानगर झोपडपट्टी, अशोक बाग व तक्का वसाहत येथील झोपडपट्टीवासीयांसाठी, आसूडगाव सर्वे क्रमांक ५३ च्या भूखंडावर आहे. या प्रकल्पात एकूण १,५२६ घरे असून त्यातील ६९६ घरे ईडब्ल्यूएस गटासाठी आणि ८४० घरे एलआयजी गटासाठी आहेत तर १९८ व्यावसायिक गाळ्यांचा प्रस्ताव आहे.
घरोघर जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याच्या प्रस्‍तावासही मंजुरी मिळाली आहे. त्‍यामुळे त्‍यांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेता येईल. पनवेल महापालिका क्षेत्रात २०२१-२२ अखेर १,२१२ नोंदणीकृत दिव्यांग बांधव आहेत. नवीन सर्वेक्षणात त्‍यात वाढ होऊ शकते. या सर्वेक्षणासाठी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महामार्गावरील पथदिव्यांसाठी १० कोटींची तरतूद
महापालिका क्षेत्रातू जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी जंक्शन ते कळंबोली जंक्शन दरम्‍यान कायम अंधार असतो. हा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. महासभेत महामार्गावरील २६७ पथ दिवे व ९१८ सोडीयम पथदिवे यांची देखभाल-दुरुस्‍ती व नवीन एलईडी बसवण्यासाठी १० कोटी ४ लक्ष ७४ हजार ८८० रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

रोजबाजार, पार्किंगसाठी सात कोटी ७६ लाख
पनवेल महापालिका प्रभाग ‘ड’ मधील भूखंड क्रमांक १९३ येथे रोजबाजार विकसित करण्यात येणार आहे. या इमारतीत तळमजल्यावर ३०४ ओटे व पहिल्या मजल्यावर १०० ओटे व ७० गाळे प्रस्तावित करण्यात आले आहेत. याशिवाय वाहनतळासाठी दोन मजले राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी सात कोटी ७६ लाख १२ हजार ६२६ रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आले

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86346 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top