
गुरुचरण, पडीक जमीन हस्तांतरण नको
खारघर, ता. २० (बातमीदार) : पनवेल महापालिका हद्दीत गुरचरण व पडीक जमीन आहे. ती कोयना प्रकल्पग्रस्तांना हस्तांतरण केली जाते आणि विकसक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून तुटपुंज्या दरात जमीन हस्तांतरण करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. भविष्यात पनवेल महापालिकेला समाजसेवी प्रकल्पांसाठी जमिनीची गरज भासणार आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील गुरचरण व पडीक जमीन हस्तांतरण करू नये, असे पत्र नगरसेवक हरेश केणी यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून रुग्णालय, शाळा व उद्यान व घनकचरा प्रकल्पांसाठी जमिनीची गरज भासणार आहे. तसेच सदर जमिनीवर इमारती उभ्या झाल्यास भविष्यात पनवेल महापालिकेला नागरी सुविधा देताना ताण पडणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून पालिका हद्दीतील गुरुचरण व पडीक जमीन हस्तांतरण करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86348 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..