
लिफ्टच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० ः नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना उत्तर प्रदेश, मोहमदाबाद येथील आशिष चव्हाण हा कामगार लिफ्टच्या डक्टमध्ये पडला. या वेळी डक्टमधील लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर येथे घडली. थिराणी शाळेजवळ पुराणिक बिल्डर्सचे तळ अधिक ३० मजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना रविवारी रात्री २२ वर्षीय आशिष हा कामगार लिफ्टच्या डक्टमध्ये वरून खाली पडला. या वेळी डक्टमधील लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वर्तकनगर पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गॅस कटरने सदर लोखंडी परांचीचा पाईप कट करून कामगाराला बाहेर काढले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली. त्यानंतर कामगाराला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86349 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..