मराठी पाट्यांसाठी मुदतवाढ नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी पाट्यांसाठी मुदतवाढ नाहीच
मराठी पाट्यांसाठी मुदतवाढ नाहीच

मराठी पाट्यांसाठी मुदतवाढ नाहीच

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईतील दुकाने, आस्थापनांच्या दर्शनी भागात ठळकपणे मराठी पाट्या लावण्यासाठी मुंबई पालिकेची मुदत ३० जूनला संपत आहे. मात्र दुकानमालक संघटनांच्या माध्यमातून आणखी सहा महिने ही मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे; परंतु पालिकेने या मुदतवाढीस नकार दिला आहे. यापुढे आणखी मुदतवाढ देण्यासाठी कोणतेही सबळ कारण नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.

मराठी पाट्यांची इतक्या कमी वेळात अंमलबजावणी करता येणे शक्य नसल्याने सहा महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. मात्र मुदतवाढ देण्यास पालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे येत्या ३० जूनपर्यंत नियमांची अंमलबजावणी न केल्यास कारवाई केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले. मराठी पाट्या न लावण्यासाठी कोणतेही सबळ कारण नसल्याचे बैठकीत दिसून आल्याचे ते म्हणाले.

अनेक दुकानदारांनी एलईडी, तसेच मराठीत पाट्यांसाठी काम करणारे कामगार मिळत नसल्याचीही सबब सांगितली. काही ठिकाणी काम करून देण्यासाठी दिरंगाई होत असल्याचेही दुकानदारांकडून सांगण्यात आले; पण ही कारणे आणखी मुदतवाढ देण्यासाठी पुरेशी नसल्याचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच सहा महिन्यांची मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत ३० जूनपर्यंत मराठी पाट्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. मुदतीनंतर नियमाची अंमलबजाणी न करणाऱ्या दुकानदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी सांगितले.

काय आहे नियम?
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86373 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top