‘अग्निपथ''विरोधात राज्यात पडसाद उमटण्याची चिन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अग्निपथ''विरोधात राज्यात पडसाद उमटण्याची चिन्हे
‘अग्निपथ''विरोधात राज्यात पडसाद उमटण्याची चिन्हे

‘अग्निपथ''विरोधात राज्यात पडसाद उमटण्याची चिन्हे

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : केंद्र सरकारने घोषित केलेल्या महत्वाकांक्षी अग्निपथ योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पडसाद उमटत आहे. सरकारच्या विरोधातील या आंदोलनात सरकारी मालमत्ता असलेल्या रेल्वेला आंदोलकांनी लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातही पडसाद उमटू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. यामुळे रेल्वे पोलिस सतर्क झाले आहेत.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर, रेल्वेने आपल्या सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या असून कर्मचाऱ्यांना नव्याने सुट्याही देणे बंद केले आहेत. गुप्तचर खात्याकडून माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे यार्डाची सुरक्षा वाढवण्यात आली असून रेल्वे पोलिसांना हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई जीआरपी आयुक्त कैसर खालिद यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेतली आहे. तसेच रेल्वे पोलिसांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बैठक देखील घेण्यात आली आहे.

मुंबईसह लगतच्या क्षेत्रात विशेष लक्ष
मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये, आंदोलक रेल्वेला आणि रेल्वेची मालमत्ता लक्ष्य करू शकतात. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त करण्यात येत आहे. या प्रकरणात बिहारमधील कोचिंग सेंटर्सची भूमिका संशयास्पद असल्याने कोचिंग सेंटर्स आणि समाजमाध्यमावर विशेष नजर ठेवली जात आहे. गुप्तचर खात्याकडून माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांना राखीव पोलिसांची एक कंपनी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, स्थानकात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आणि विशेषत: तरुणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86374 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top