ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकित विक्रमगडने खाते उघडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकित विक्रमगडने खाते उघडले
ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकित विक्रमगडने खाते उघडले

ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकित विक्रमगडने खाते उघडले

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) ः जव्हार- मोखाडा- विक्रमगड सर्वसाधारण मतदार संघातून विक्रमगडचे प्रशांत भालचंद्र नडगे (एकूण ३९२ मते) व मोखाड्याचे हेमंत बाळकृष्ण लहामगे (एकूण ५१७ मते) बहुमताने निवडून आले. ही निवडणूक ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची लढत होती. आतापर्यंत विक्रमगड तालुक्यातील एकाही उमेदवाराला संचालक पदाची निवडणूक जिंकता आली नव्हती.
या निवडणुकीमध्ये १० उमेदवार रिंगणात होते. विक्रमगड, जव्हार, मोखाडा असा मतदारसंघ असल्याने सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात मते मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रयत्नाची शर्थ लागली होती. या मध्ये हेमंत लहामगे व प्रशांत नडगे यांच्या युतीने पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून विजयी पताका फडकावली. विक्रमगड तालुक्याला पहिल्यांदाच संचालक पद मिळाल्याबद्दल प्रशांत नडगे यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते
रवी बुधर ३४६
राजाभाऊ चव्हाण ३५
साईनाथ डोके ३८
प्रकाश डोले ३३७
हेमंत लहामगे ५१७ (विजयी)
प्रशांत नडगे ३९२ (विजयी)
परशुराम माळी २४
विकास पालवे १०९
संतोष पाटील ३३०
किरण सातवी ४०

विक्रमगड येथील विजयी उमेदवार प्रशांत नडगे
मोखाड्यातील विजयी उमेदवार हेमंत बाळकृष्ण लहामगे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86405 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top