सी एस आर च्या माध्यमातून मिळाली दिव्यांगांना नवसंजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सी एस आर च्या माध्यमातून मिळाली दिव्यांगांना नवसंजीवनी
सी एस आर च्या माध्यमातून मिळाली दिव्यांगांना नवसंजीवनी

सी एस आर च्या माध्यमातून मिळाली दिव्यांगांना नवसंजीवनी

sakal_logo
By

कल्याण, ता. २१ (बातमीदार) : अपघात किंवा काही वैद्यकीय कारणांनी पाय गमावलेल्या ५४ दिव्यांगांना कृत्रिम पायांचे (जयपूर फूट) मोफत वाटप रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या ‘रोटरी दिव्यांग सेंटर’ येथे रविवारी करण्यात आले.
ऍटोस इंडिया या जागतिक कीर्तीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत कार्यक्रमासाठी अर्थसाह्य दिले. कल्याण, ठाणे व मुंबई परिसरातील गरजू दिव्यांग स्त्री-पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला. पाय गमावलेल्या व्यक्ती केवळ त्यांचा रोजगार गमावत नाहीत, तर स्वाभिमानाने जीवन जगण्याची उमेद गमावतात. वजनाने हलके व उत्तम दर्जाचे कृत्रिम पाय विनामूल्य मिळालेले दिव्यांग बांधव सर्वार्थाने पायावर उभे राहू शकतील, अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
ॲटोसचे सीएसआरप्रमुख मुरली मेनन व संचालक मंडळ सदस्य नीलेश भोपटकरसुद्धा या शिबिरात सहभागी झाले व त्यांनी दिव्यांगांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. सामाजिक दायित्व निधीतून समाजोपयोगी कामे करणे सर्व कंपन्यांना बंधनकारक आहे, परंतु केवळ कायद्याची सक्ती म्हणून याकडे न पाहता ॲटोस इंडियासारख्या कंपन्या समाजातील दुर्लक्षित घटकासाठी भरीव योगदान करतात हे निश्चित प्रशंसनीय व अनुकरणीय आहे, अशी भावना रोटरीचे अध्यक्ष नितीन माचकर यांनी व्यक्त केली.
----
जयपूर फूट वाटप शिबिरांचे आयोजन
ॲटोस इंडिया कंपनीने त्यांच्या ‘सामाजिक दायित्व’मधून ३०० कृत्रिम पायांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून पुणे, चंडीगड व कल्याण येथे मोफत जयपूर फूट वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच रोटरी दिव्यांग सेंटर येथे दर शनिवार व रविवारी गरजू दिव्यांगांना जयपूर फूट, कॅलिपर मोफत दिले जातात, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष नितीन माचकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86418 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top