पोहण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोहण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू
पोहण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : दिवा, खर्डी गाव, खडके पाडा येथील खडकेश्वर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शिळफाटामधील रहिवासी असलेल्या मतीउल्ला उल्ला खान (१८) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच त्याचा मृतदेह रात्री उशिरा शोधून बाहेर काढण्यात यश आला.
खडकेश्वर तलाव येथे मतीउल्ला हा तरुण मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पोहता न आल्याने तो तलावात बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी डायघर पोलिस, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच त्या तलावात स्कूबा डायवर्स, स्थानिक गावातील व्यक्ती, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांच्यामार्फत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले होते. रात्री उशिरा ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. तो बाहेर काढून डायघर पोलिसांच्या ताब्यात दिल्‍याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86437 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top