वसई विरारला पाणीटंचाईची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरारला पाणीटंचाईची भीती
वसई विरारला पाणीटंचाईची भीती

वसई विरारला पाणीटंचाईची भीती

sakal_logo
By

वसई, ता. २१ (बातमीदार) ः वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार व उसगाव धरणात केवळ १५ दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सूर्या धामणी धरणावरच पाणीपुरवठ्याची मदार राहणार आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. जर पाऊस आला नाही, तर वसई-विरारवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

वसई-विरार शहराला सूर्या धामणी, उसगाव व पेल्हार या तीन धरणांतून पाणीपुरवठा होतो. वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वसई, नालासोपारा, नायगाव, विरार शहर व गावात वसई-विरार महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रशासनाने ५५ हजारांहून अधिक नळजोडण्या दिल्या आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याची टंचाई भेडसावू नये म्हणून नऊ प्रभागांत पाण्याचे नियोजन केले असून त्यानुसार वितरण केले जात आहे, परंतु तरीही कमी दाबाने, अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक गृहसंकुले, बैठ्या घरांना पाणीटंचाई भासत आहे. त्यातच सध्या धरणाचा साठा खालावत चालला असल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे झडपांतून होणारी गळती, जलवाहिन्यांचे बिघाड, धरणाच्या ठिकाणी पम्पिंग स्टेशनला वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असतो. अशात जुलै महिन्यात पाऊस झाला नाही, तर धरणातील पाणी पूर्णतः संपून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते. उसगाव व पेल्हार या दोन धरणांत केवळ ३२ टक्केच साठा असून या धरणाची क्षमतादेखील कमी आहे.
----
धरण - क्षमता (दशलक्ष घनमीटर) - उपलब्ध साठा
सूर्या धामणी- २६५.४६ - ६०.४०९ -(२१.८६ टक्के)
पेल्हार- ३.५६ - १.१९५ (२४.०९ टक्के)
उसगाव- ४.९८ - ०.३१६ (८.८७ टक्के)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86464 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top