नवी मुंबईत आमदारांसह बालकांचा योग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत आमदारांसह बालकांचा योग
नवी मुंबईत आमदारांसह बालकांचा योग

नवी मुंबईत आमदारांसह बालकांचा योग

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ : नवी मुंबई शहरात मंगळवारी ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाला. महापालिकेतर्फे वाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे योगासनांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. याप्रसंगी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आदी अधिकारी उपस्थित होते.

आरोग्यासह संपूर्ण व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या योगाचे महत्त्व यानिमित्ताने सांगण्यात आले. पालिकेतर्फे सिडको महामंडळ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आयोजित विशेष उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. सहजपणे करता येणाऱ्या विविध योग प्रकारांमुळे शरीराच्या हालचाली होऊन शरीर सुदृढ राखण्यास मदत होते. योगासनांमधील प्राणायामामुळे श्वासाचे संतुलन, तसेच शरीरासह मनाचे संतुलन राखण्यास मदत होते. मनाची एकाग्रता वाढवण्यासही याचा उपयोग होतो. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. शरीरावरच नव्हे, तर मनावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यासोबतच ऊर्जा आणि चैतन्याचा लाभ होतो, असा नियमित योग करणाऱ्या अनेकांचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच आबालवृद्ध नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86473 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top