थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः सेवा खंडीत होण्याच्या भितीपोटी मोबाईल, डिश टिव्ही, इंटरनेट यांसारख्या सेवांचा मोबदला तातडीने भरला जातो. मात्र, मुलभूत गरज असणाऱ्या व या सेवा ज्या वीजेवर अवलंबून आहेत त्या वीजेचा परतावा मात्र वेळेत मिळत नाही. त्यामुळे थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. महावितरणच्या कल्याण परिमंडळांतर्गत कल्याण एक आणि दोन मंडळ कार्यालयांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सह व्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले, ग्राहकाने वापरलेल्या वीजबिलाचा परतावा वेळेत मिळाला तरच महावितरणला वीज खरेदीचा खर्च, पारेषणचे भाडे, अखंडित वीज सेवा देता येणे शक्य आहे. त्यामुळे चालु वीज बिलासह थकबाकी वसुलीला दुसरा कोणताही पर्याय नाही. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांच्या जोडण्यांची चालु वीजबिले दरमहा भरून घ्यावीत.
शंभर टक्के अचूक वीजबिलासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या कामाच्या पडताळणीत नियमितता ठेवावी. तसेच मुख्य कार्यालयाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार वीज वितरण हानी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सह व्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले. या बैठकीला कल्याण मंडळ एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रणाली विश्लेषक रंजना तिवारी यांच्यासह कल्याण पूर्व अणि पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर एक आणि दोन विभाग कार्यालयांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86491 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top